चाकणमध्ये रास्तारोको करू नका!, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आवाहन 

30 जुलैची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती 

चाकण: मराठा आरक्षणासाठी 30 जुलैला झालेल्या आंदोलनाचा गैरफायदा समाजकंटकांनी घेतला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवार (दि. 9) चे आंदोलनात रस्तारोको करू नये व शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाकण येथे सकल मराठा समाच्यावतीने होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, परिसरातील नगरपरिषदांचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांसह खेड तालुक्‍यातील पोलीस पाटील, व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदीप पाटील म्हणाले की, गुंतवणूकीच्या दृष्टीने चाकण परिसरात जागतिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. नुकत्याच झालेल्या आंदोलनामुळे चुकीचा संदेश पसरला आहे. डागळलेली प्रतिमा सुधरविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे तसेच आंदोलकांच्या भावना शासनाकडे तातडीने पोहोचविल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. अपर पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपूते म्हणाले की, चाकण औद्योगिक वसाहतील सर्वच कारखाने बंद राहणार आहेत. ज्या कारखान्याचे कामकाज सुरू राहील त्यांना अतिरिक्त संरक्षण देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तर पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोणपे यांनी आभार आभार मानले.

गजर बाहसल्यास जमावबंदी लागू करणार 

दावडी – खेड तालुक्‍यात जमावबंदी लागू करण्यात आलेली नसून आवशकता भासल्यास त्या ठिकाणी जमावबंदी करण्यात येईल त्याबाबत आदेश तयार करण्यात आलेला आहे. मात्र, आंदोलन करताना शांत पद्धतीने करावे, कोणतीही शासकीय किंवा खासगी मालमत्तेची वित्तहानी होईल, असे कृत्य करू नये असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)