ग्रामपंचायत कर भरण्याचे नागरिकांस आवाहन

File photo

खटाव  – मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्याने सर्वत्रच आर्थिक वसुलीचे व आर्थिक उलाढालीचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा ग्रामपंयतीच्या सर्व खातेदारांना घरफळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले जात आहे. कर वसूलीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी फिरून कर वसूली करत आहेत. ग्रामपंचातीची गाडीदेखील स्पिकरवरुन कर भरण्याविषयी जनजागृती करत आहे. ग्रामपंचायत वसूल होणाऱ्या करातूनच दिवाबत्ती, आरोग्य, पाणीपुरवठा अशा अनेकविध सेवा नागरिकांना पुरवत असते.

करदात्यांनी जर वेळेत कर भरला नाही तर नळ कनेक्‍शन बंद करणे, ग्रामपंचायतीमार्फत नोटीस बजावणे व प्रसंगी जप्ती सारखा प्रसंगालाही तोंड द्यावे लागते. अशा कटू प्रसंगांना टाळण्यासाठी व गावाच्या भल्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख व ग्रामविकास अधिकारी
डी. ए. भोसले यांनी जनतेस केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)