स्वार्थीपणा सोडण्याचे पोप यांचे आवाहन

जगभर नाताळच्या सणावर निराशेचे सावट

व्हॅटिकन सिटी: नागरीकांनी भौतिकवादी जीवनाचा त्याग करावा, असे आवाहन ख्रिश्‍चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांनी आज केले. नाताळनिमित्त जगभरातील नागरिकांना दिलेल्या शुभेच्छा संदेशामध्ये पोप फ्रान्सिस यांनी ही अपेक्षा व्यक्‍त केली आहे. नवीन कट्टरवादी गट चर्च आणि प्रार्थनास्थळांवर, मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करत आहेत, याबाबतही पोप यांनी चिंता व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारी रात्री व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स बासिलिका चर्चच्या आवारामध्ये झालेल्या सामुहिक प्रार्थनेसाठी हजारो ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती. त्यांना उद्देशून दिलेल्या धार्मिक प्रवचनामध्ये पोप यांनी अतृप्त लोभीपणा सोडून देण्याचे आवाहन केले. “अतृप्त लोभ मानवाच्या इतिहासापासून आहे. आजही एकजण ऐषोआरामाचे जीवन जगतो, तर अनेक इतरजणांना रोज पोट भरणे भरणेही अवघड होते. हा विरोधाभास आहे.’ असे पोप म्हणाले. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा होत असलेल्या नाताळच्या सणासाठी पोप फ्रान्सिस सहाव्यांदा संबोधन केले.

यावर्षी अमेरिकेमध्ये ख्रिसमसच्याच काळात गेल्या तीन दिवसांपासून “शटडाऊन’असल्यामुळे तेथे नागरिकांमध्ये सण साजरा करण्याचा उत्साह कमी झाला. उत्तर अमेरिकेत एरोस्पेस डिफेन्स कमांडच्यावतीने सांताक्‍लॉजच्या ट्रॅक्‍टरची प्रतिकृती केली होती. त्यातून लहान मुलांना भेटी वाटण्यात आल्या. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र “सांताक्‍लॉज’ अस्तित्वात असण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून नागरिकांचा हिरमोड केला.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियात बाजारातील इमारत पडण्याच्या धोक्‍यामुळे रिकामी करण्यात आली. त्यामुळे नाताळच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. युरोपिय संघातून इंग्लंड बाहेर पडण्याच्या पार्श्‍वभुमीवर लंडनमध्ये सेंट पीटर्सबर्ग राजप्रासादामध्ये महाराणी एलिझाबेथ या नागरिकांना संबोधित करणार आहेत. तर स्पेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर बार्सिलोना येथे दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये पिवळे डगले घातलेल्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे अजूनही अशांतता आहे. तेथेही नाताळच्या सणासाठी नागरिकांची उत्साही मनस्थिती नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)