पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात एका वक्त्याने उपस्थित केलेल्या माहितीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे आक्षेप नोंदवत, जाहीररीत्या नाराजी दर्शविली होती. त्या पार्श्वभूमीवर व्याख्यात्यांच्या काही विधानांमुळे ऐतिहासिक व्यक्तींचा अनादर होऊन ज्या भावना दुखावल्या आहेत, त्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी दिलगिरी व्यक्त केली आहे.
विद्यापीठ प्रशासनाद्वारे मुख्य इमारतीतील सरस्वती सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दुसऱ्या एका व्याख्यात्याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानादरम्यान व्याख्यात्यांने उपस्थित केलेल्या माहिती संदर्भात काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. प्रशासनाकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.