शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्रात दुसरा स्टार नाही- आमिर खान

महाराष्ट्रात सगळ्यांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्रात दुसरा स्टार नसल्याचे अभिनेता आमिर खान यांनी म्हटले आहे. ठाकरे हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्याचदिवशी शौमिक सेन दिग्दर्शित चीट इंडिया आणि कंगनाचा मणिकर्णिका प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अजून कुठला सिनेमा रिलीज होऊ नये, अशी शिवसनेची इच्छा आहे.

राज्य शासनामार्फत ‘फाईट ओबेसिटी’ या उपक्रमांतर्गत लठ्ठपणाच्या समस्येवर सातत्याने काम करण्यात येत आहे. या अंतर्गतच लहानमुलांच्या लठ्ठपणावर लक्ष केंद्रीत करून काम करण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ.संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे आज अनावरण करण्यात आलेया कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते अमिर खान उपस्थित होते.
दरम्यान ठाकरे चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या चित्रपटांनी आपली चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर ढकलली आहे. यावर पत्रकारांनी आमिरला प्रश्न केला असता. महाराष्ट्रात सगळ्यांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. नैसर्गिकपणे बाळासाहेबांशी कोणी निर्माता स्पर्धा करणार नाही. चित्रपट निर्माते योग्यवेळी फिल्म रिलीज करतात. वाद आणि स्पर्धा निर्माण होणार नाही याची सर्वजण काळजी घेतात. बाळासाहेंबापेक्षा मोठा स्टार नाही, असे तो म्हणाला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)