अनुष्का शेट्टीबरोबर प्रभासचे डेटिंग नक्की खरे की खोटे ?

“बाहुबली’ आणि “बाहुबली 2′ नंतर प्रभास बॉलिवूडमधील हिट ऍक्‍टरच्या लीस्टमधील एक बनला. त्याबरोबरच अनुष्का शेट्टीबरोबरच्या त्याच्या कथित अफेअरचीही खूप जोरदार चर्चा झाली. या दोघांनी यापूर्वी अनेकवेळा या अफेअर बाबतच्या प्रश्‍नांना शिताफीने बगल दिली आहे. पण “कॉफी विथ करण’मध्ये करण जोहरने या दोघांना थेट प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. प्रभासला या अफेअरबाबत विचारले असता, तो नुसताच हसला. तर अनुष्कानेही त्याला थेट उत्तर दिले नाही.

या प्रश्‍नाला उत्तर त्याने (प्रभासने) द्यायला हवे, असे सांगून तिने चेंडू प्रभासच्या कोर्टमध्ये ढकलून दिला. यामुळे या दोघांचे नक्की अफेअर आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. प्रभासचा “साहो’ पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. “साहो’मध्ये प्रभासबरोबर श्रद्धा कपूर दिसणार आहे. यातील ऍक्‍शन सीन आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये तब्बल 37 कार आणि 5 ट्रकचा चक्काचूर करण्यात आला आहे. त्याबाबत लवकरच सविस्तर माहिती मिळेल. पण अनुष्काबरोबरच्या प्रभासच्या अफेअरबाबत मात्र अजूनही खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)