अनुष्का आणि विराटच्या लग्नाचा पहिला वाढदिवस

दीपिका आणि रणवीरचे लग्न झाले. आता प्रियांका आणि निकचे लग्न होणार आहे. या दोन सेलिब्रिटी विवाहांदरम्यान अनुष्का आणि विराटच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा होतो आहे. हा क्षण विरुष्का खास पद्धतीने सेलिब्रेट करणार आहेत. हे दोघे एका रोमॅंटिक लोकेशनवर जाणार आहेत, असे समजते आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह गेल्यावर्षी 11 डिसेंबरला इटलीमध्ये झाला होता. लग्नानंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली असताना हे दोघेजणही तेथेच निवांत टूरवरही गेले होते.

सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तर अनुष्का “झिरो’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्का ऑस्ट्रेलियात जाणार आहे. तिथे क्रिकेट टीमबरोबर असलेला कॅप्टन कोहली आपल्या प्रिय पत्नीबरोबर काही क्षण निवांत घालवणार आहे. ही रोमॅंटिक डेट या दोघांनी बऱ्याच महिन्यांपूर्वी निश्‍चित केली होती. तशी कल्पनाही अनुष्काने “झिरो’च्या युनिटला देऊन ठेवली होती. लग्नाचा वाढदिवस विराटबरोबर साजरा केल्यानंतर अनुष्का पुन्हा एकदा “झिरो’च्या प्रमोशनसाठी येणार आहे. त्यांचे हनिमून आणि मॅरेज ऍनिव्हर्सरी दोन्ही टीम इंडियाच्या टूरच्या अनुसारच प्लॅन केले गेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)