अनुराग ठाकूर यांनी दिला पीसीबीला सल्ला 

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट मंडळ( पीसीबी)ने भारतीय क्रिकेट नियम मंडळ (बीसीसीआय)हे द्विपक्षीय मलिकेबाबतीतच्या सहमती पत्राचा आदर करत नाही, असे सांगत आंतरराष्ट्रीय मंडळाकडे धाव घेत खटला चालविला होता. त्यात त्यांनी नुकसान भरपाईसाठी रकम मागितली होती. याबाबत आयसीसीच्या तक्रार निवारण मंडळाने निर्णय देत, नुकसान भरपाई ही तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे.

या निर्णयाचे स्वागत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केले असून आपल्या दहशतवादी कारवाया रोखण्याचा सल्ला देखील दिला आहे.

पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांनी काही दिवसांपूर्वी द्विपक्षीय मलिकेबाबत भाष्य करताना नुकसान भरपाई मागितली होती. त्यात त्यांनी जर आयसीसीने याचा योग्य मार्गाने निकाल लावला नाही तर शांततेच्या मार्गाने पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. या निर्णयानंतर ते काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)