यु मुंबा विरुद्ध अनुप कुमार ठरणार का जयपूरचा ‘बोनस पॉईंट’?

प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बोनस किंग, कॅप्टन कूल म्हणून सर्वांना परिचित असणारा अनुप कुमार यंदाच्या मोसमात जयपूर पिंक पँथर संघासाठी करारबद्ध झाला आहे. त्याने सलग पाच मोसमात यु मुंबा संघाचे कर्णधारपद भूषवले होते. पहिल्या तीन मोसमात यु मुंबाला सलग तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देण्यात अनुपची भूमिका खूप मोठी होती. त्यात एकवेळा विजेतेपद तर अन्य दोन वेळा उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावे लागले होते.

आज जयपूर विरुद्ध यु मुंबा सामन्यात जेव्हा अनुप कुमार या सामन्यात खेळण्यास उतरेल तेव्हा तो प्रथमच यु मुंबा संघाच्या विरोधात खेळेल. पहिल्या पाच मोसमात अनुप कुमार म्हणजेच यु मुंबा असे समीकरण होते. त्याच्याविना यु मुंबा संघाचा विचार देखील कबड्डीप्रेमी करू शकत नव्हते. परंतु मागील दोन्ही मोसमात अनुपची घरसलेली कामगिरी आणि त्यात नवीन दमाच्या खेळाडूंची होत असलेली चांगली कामगिरी यामुळे यु मुंबाने त्याला रिटेन केले नाही तेव्हाच सर्वांना धक्का बसला. त्यानंतर त्याला जयपूर पिंक पँथर संघाने करारबद्ध केले.

अनुप हा प्रो कबड्डीमधील सर्वात वलयांकित खेळाडूंपैकी एक आहे. पहिल्या तीन मोसमात ज्यांनी त्याच्या रेडींगमधील जादू पहिली आणि अनुभवली आहे त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ खेळाडू असू शकत नाही.  तो पहिल्या मोसमात सर्वाधिक गुण मिळवणारा रेडर होता. त्याचे अनेक विक्रम पाचव्या मोसमापर्यंत टिकून होते. काही अजूनही टिकून आहेत. ज्यांना मोडणे खूप कठीण आहे.

अनुप कुमारने प्रो कबड्डीमध्ये ७८ सामन्यात खेळताना ५४६ गुण मिळवले आहेत. त्यात त्याने ४८९ रेडींग गुण मिळवले आहेत तर ५७ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. आजच्या सामन्यात जर त्याने ११ गुण मिळवले तर तो ५०० रेडींग मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील होईल. अशी कामगिरीत करणारा तो पाचवा खेळाडू ठरेल.

ज्या संघाला त्याने पाच वर्षे दिली आणि ज्याच्यामुळे त्या संघाला वेगळी ओळख मिळाली त्या संघाविरुद्ध तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे. ‘बोनस किंग’ या नावाने देखील अनुप कुमारला प्रो कबड्डीमध्ये ओळखतात. यु मुंबा विरुद्ध हा ‘बोनस किंग’ जयपूरसाठी बोनस ठरणार का  याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)