आम्ही पूर्णपणे तयार ! आवश्यकता असल्यास उत्तर देऊ ; लष्कराच्या तिन्ही दलाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: आम्ही पाकिस्तानला पूर्णपणे उत्तर देण्यास तयार असल्याचे, लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे आम्ही उध्वस्त करत राहू, असे सुद्धा स्पष्ट केले.

भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सांगितले की 26 फेब्रुवारीला पाकिस्तानने सीझफायरचा भंग केला होता, त्याचे भारतीय सेनेने सडेतोड उत्तर दिले आहे. 2 दिवसात पाकिस्तानने 35 वेळा सीझफायरचे उल्लंघन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एयर वाइस मार्शल आर जी के कपूर म्हणाले, पाकिस्तानने पाकिस्तानी विमानाने भारतीय वायु सीमांचा भंग केला परंतु आमच्या सैनिकी तुकड्यांना कोणताही त्रास झाला नाही. आमच्याकडे मजबूत पुरावे आहेत की आम्ही दहशतवादी शिबिरास हानी पोहचविली आहे. आमच्या मिग 21 विमानांपैकी एक विमान क्रॅश झाला परंतु आम्ही पाकिस्तानचा एफ -16 विमान उद्वस्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)