मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; नवाब मलिक यांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला असून संरक्षण जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी खळबळ माजली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. या तरुणानं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकरी, बेरोजगार तरूण, मजूर वर्ग अशा सर्वांचीच फसवणूक सरकारने केली आहे. आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत झालेला असून त्यामुळे मंत्रालयातच आत्महत्येचे प्रकार घडत आहेत, आता तरी या सरकारला जाग येणार का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे.  तसेच याचे गांभीर्य सरकारच्या लक्षात येत नसेल तर भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत मलिक यांनी मांडले


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)