उत्तरप्रदेशात आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उत्तरप्रदेशात आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. मुहम्मद अबसार (वय 24) असे त्याचे नाव आहे. त्याला शुक्रवारी रात्री गाझियाबादमध्ये पकडण्यात आले.

मुहम्मदच्या अटकेनंतर एनआयए पथकांनी शनिवारी गाझियाबादबरोबरच मेरठ आणि हापूरमध्ये छापे टाकले. मुहम्मदच्या अटकेमुळे देशात विविध ठिकाणी आत्मघाती हल्ले आणि साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या 12 वर पोहचली आहे. अटक करण्यात आलेले हरकत-उल्‌-हर्ब-ए-इस्लाम या गटाचे सदस्य आहेत. इसिस या खतरनाक दहशतवादी संघटनेमुळे प्रेरित झालेल्या त्या गटाचा पर्दाफाश मागील महिन्याच्या अखेरीस करण्यात आला. त्या गटाने राजकारणी आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील महिन्याच्या कारवाईवेळी रॉकेट लॉंचर, आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरली जाणारी जाकिटे बनवण्यासाठीची सामग्री आणि तब्बल 25 किलो स्फोटकांसाठीची सामग्री जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय, 91 मोबाईल फोन्स, 134 सिम कार्डस्‌, 3 लॅपटॉप्स, चाकू, तलवारीही हस्तगत करण्यात आल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)