डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकास अटक

औरंगाबाद येथे कारवाई : नालासोपारा येथील कारवाईतून धागेदोरे

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने शनिवारी मोठी कारवाई करत सचिन अंधुरे याला अटक केली आहे. त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. सचिन याला पुढील चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एटीएसने म्हटले आहे.

सचिन अंधुरे याला औरंगाबाद येथे शनिवारी अटक करण्यात आली. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिनची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आले आणि याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सचिनकडून डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात गेल्या पाच वर्षांत दुसरी अटक ठरली आहे.

एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतून सचिनला ताब्यात घेतले होते. त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी नेत असल्याचे अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जमविणाऱ्या आरोपींचा गेल्या आठवड्यात एटीएसने पर्दाफाश केला होता. अटकेतील तीन जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील शरद कळसकर याचा समावेश आहे. दरम्यान, सचिन अंधुरेला आई-वडील नसून एक मोठा भाऊ आहे. तो विवाहित आहे त्याला 2 मुले आहेत. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे.

काय आहे प्रकरण
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी बालंगधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्‍वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून जात होते. तेव्हा 7 वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्‍यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघंही हल्लेखोर बाईकवर बसून फरार झाले होते. नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली. साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)