अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना; तरूणाची हत्या

जयपूर- राजस्थानमध्ये अल्वर जिल्ह्यात आणखी एक मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. अल्वरमधील थलसा गावांत हरीश जाटव नावाच्या व्यक्तीला जमावाने इतकी भयंकर मारहाण केली की उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे प्रकरण गुरूवारचे आहे. हरीश जाटव आपल्या बाईकने घरी येत होते तेव्हा चौपानकी पोलीस ठाण्याजवळ त्यांची बाईक एका वृद्ध महिलेला धडकली. यानंतर तेथे जमावाने गर्दी केली आणि हरीश जाटव यांना प्रचंड मारहाण केली.

हरीशच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. अल्वरमध्ये एकामागोमाग एक होत असलेल्या घटनांमुळे गहलोत सरकारवर सवाल उपस्थित होण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत नवा कायदा बनवण्याबाबत विचार करत आहे तर राज्य पोलीस सामान्य कायदेव्यवस्थाही योग्य प्रकारे लागू करू शकत नाही आहे. राजस्थानातील मॉब लिंचिंगची ही काही पहिली घटना नाही आहे. याआधीही अनेक घटना घडल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)