ट्रम्प यांना आणखी एक धक्का -ब्रेट मॅकगर्ग यांचा राजीनामा

वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्‍का बसला आहे. संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांच्यानंतर आता त्यांचे विश्‍वसनीय ब्रेट मॅकगर्ग यांनीही राजीनामा दिला आहे. डोनॉल्ड ट्रम्प यांची धोरणे पसंत नसल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी जाहीर केले आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील जागतिक गटबंधनात अमेरिकेचे राजदून म्हणून ब्रेट मॅकगर्ग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सन 2015 मध्ये ब्रेट मॅकगर्ग यांची नियुक्ती तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती, उगवते अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती कायम ठेवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अद्याप इस्लामिक स्टेटचा पूर्ण पाडाव झालेला नाही. अशा परीस्थितीत जर अमेरिकेने सीरियामधूप्न सैन्य मागे घेतले, तर दहशतवाद्यांना पुन्हा उठाव करण्याची संधी मिळेल असे ब्रेट यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)