दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019 या कालावधीत होणार असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत होणार आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन 15 दिवसांची मुदत देऊन लेखी स्वरुपात सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून सूचना दाखल करण्यात आल्या होत्या. या प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करण्यात आले. मात्र या सूचना अमान्य करण्यात आल्या असून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आलेले आहे.

-Ads-

दहावीच्या पुनर्रचित व जुन्या अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षा ही 1 मार्च ते 22 मार्च 2019 या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत होणार आहे. बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषय व व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षाही याच कालावधीत होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी जाहीर केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे लेखी परीक्षा पूर्वी जाहीर करुन ते शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त अन्य संकेतस्थळावरील व व्हॉट्‌सअॅपच्या माध्यमातून “व्हायरल’ होणारे वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)