एचआयव्ही संक्रमित 14 हजार लोकांची माहिती ऑनलाईन जाहीर

सिंगापूर : एचआयव्ही संक्रमित 14 हजार लोकांची माहिती ऑनलाईन जाहीर करण्याचे काम मिकी फरेरा ब्रोशेज याने केले आहे. मिकी ब्रोशेज हा अमेरिकन नागरिक असून सिंगापूरमध्ये तुरुंगवासाची शिक्षा भोगून तो नुकताच मुक्त झाला आहे. तुरुंगातून मुक्‍त झाल्यानंतर त्याला सिंगापूरमधून हद्दपार करण्यात आलेले आहे. लोकांची आरोग्यविषयक माहिती ऑनलाईन जाहीर होण्याची सिंगापूरमधील ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षीच सिंगापूरच्या पंतप्रधानांसह 15 लाख लोकांची आरोग्यविषयक माहिती “लीक’ झाली होती.

मिकी ब्रोशेजने एचआयव्ही संक्रमित ज्या 14,000 लोकांची माहिती जाहीर केली आहे, त्यात 5400 सिंगापूरचे आणि 8800 परदेशी नागरिक आहेत. या सर्व लोकांची नावे,पत्ते, मोबाईल क्रमांक आदी माहिती त्याने ऑनलाईन टाकली आहे.
एचआयव्ही संक्रमित लोकांची माहिती जाहीर करणारा मिकी ब्रोशेज हा स्वत:च एचआयव्ही संक्रमित आहे. स्वत: एचआयव्ही बाधित असल्यची माहिती लपवणे, मादक पदार्थांचा व्यवहार, धोकेबाजी आदी अनेक प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. पेशाने डॉक्‍टर असलेल्या एका मित्राच्या रक्ताचा नमुना पाठवून त्याने सिंगापूरमध्ये काम करण्याचा व्हिसा मिळवला होता. त्याने हे काम कशासाठी केले हे समजू शकले नाही. आणि सिंगापूरमधून घालवून दिल्यानंतर तो कोठे गेला याची काही माहिती उपलब्ध नाही,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)