तुमच्या आघाडीच्या नेत्याचे नाव जाहीर करा; अमित शहा यांची राहुल गांधी यांना सुचना

जयपुर – राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्याचे नाव जाहीर करावे असे आव्हान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना दिले आहे. या आघाडीला स्वत:चा नेता ठरवता येत नाही, ते केवळ मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी एकत्र आले आहेत अशी टीकाहीं त्यांनी केली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांनाहीं श्रद्धांजली अर्पण केली.

या शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही असे ते म्हणाले. दहशतवादाच्या संबंधात आमच्या सरकारचे धोरण झीरा टॉलरन्सचे आहे असे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. जयपुर बरोबरच सिकार येथील कार्यकर्त्यांनाही त्यांनी संबोधित केले. भाजप केवळ जनतेच्या हिताचेच राजकारण करते असे तेथे नमूद करताना अमित शहा म्हणाले की आम्ही पराभवाने खचून जात नाही आणि विजयाने आम्ही उन्माद करीत नाही. यंदा होणारी लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून भाजपच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)