अण्णा हजारे याचं उपोषण स्थगित, महाजनांची मध्यस्थी यशस्वी

संग्रहित छायाचित्र

नगर – समाजसेवक अण्णा हजारे हे आज (दि. 2 अाॅक्टोबर) पासून विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करणार होते. सकाळी  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांचे आंदोलन सुरू होणार होते. मात्र आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी अण्णांची भेट घेतल्यानंतर त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केल्याचे समजते आहे.

दरम्यान सोमवारी सायंकाळी  जलसंपदामंत्री गिरीश महाजन हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते येऊ शकले नव्हते. त्यानंतर आज सकाळी गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडत चर्चा केली.

त्यानंतर अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेलं आजचं उपोषण स्थगित केलं आहे. जनलोकपालसह विविध मागण्यांबाबत सरकारने उचललेली पावलं अश्वासक आहेत, त्यातून आशेच किरतण दिसत आहेत, त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे, अशी घोषण अण्णा हजारे यांनी राणेगणसिध्दी येथे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)