जाॅन अब्राहम करणार ‘अनिल कपूर’ सोबत ‘पागलपंती’

बाॅलीवूडमध्ये हँडसम हंक अशी ओळख असलेला ‘जाॅन अब्राहम’ आणि मिस्टर इंडिया ‘अनिल कपूर’ यांची जोडी सिल्वर स्क्रीनवर परत एकदा दिसणार आहे. अनीस बम्जी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘पागलपंती’ हा सिनेमा तयार होणार आहे. या सिनेमात ‘जाॅन अब्राहम’ हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. सिनेमात जाॅन याच्यासोबत ‘अनिल कपूर’ ही मुख्य भूमिकेत असणार आहे.

जाॅन आणि अनिल कपूर हे यापूर्वी ‘वेलकम बॅक’ आणि ‘शूटआउट एट बडाला’ या सिनेमात एकत्र दिसले होते. माहितीनुसार हा सिनेमा काॅमेडी असणार आहे. कुमार मंगत पाठक हे सिनेमाचे निर्माते असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जाॅन सध्या बाटला हाउस या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा पुढील वर्षात 15 आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)