अन्‌ अनिल कपूर प्रत्येकवेळी श्रीदेवीच्या पाया पडायचा

अभिनेता अनिल कपूर आणि जीतेंद्र या नुकत्याच एका स्पेशल ऍपिसोडसाठी डान्स बेस्ट रिऍलिअी शो “डान्स प्लस’मध्ये हजेरी लावली होती. या ऍपिसोडमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला खास आदरांजली वाहण्यात आली. यावेळी दोघा श्रीदेवीच्या संबंधीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी अनिल कपूर म्हणाला, मी जेव्हापण त्यांना भेटायचो तेव्हा त्यांच्या पाया पडायचो, असे सांगितले.

अनिल कपुर म्हणाला, एक अभिनेता असल्याने मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, मला श्रीदेवीसारख्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अभिनयाची कोणीही बरोबरी करू शकत नाही. त्या केव्हाही स्क्रीनवर आल्यानंतर त्यांचा जादू कायम असायचा. त्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या असून त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. त्यामुळे त्यांच्या दुखःद आठवणी न ठेवता एका सदाबहार अभिनेत्री म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे. तसेच मी जेव्हा-केव्हा आपल्या वहिणी श्रीदेवी यांना भेटायचो तेव्हा त्यांच्या पाया पडायचो. पण असे करताना त्यांना खूपच अचंबित असे वाटायचे.

-Ads-

दरम्यान, अनिल कपूर आणि जीतेंद्र यांनी श्रीदेवीसोबत अनेक चित्रपटात काम केलेले आहे. 80च्या दशकात जीतेंद्र-श्रीदेवी यांच्या जोडीने हिम्मतवाला, सुहागन, तोहफा, मवाली आणि घर संसार यासारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तर अनिल कपूरने मिस्टर इंडिया, चालबाज, जुदाई आणि लम्हे आदी चित्रपटात त्यांच्या सोबत काम केलेले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)