अनिल कपूर आणि सोनम पडद्यावरही बाप-लेकीच्या भूमिकेत

बॉलीवूडमधील 90च्या दशकातील “1942 अ लव्ह स्टोरी’ चित्रपटातील “एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे आजही सर्वांच्या स्मरणात आहे. या गाण्याची जादू आजही कायम आहे. यामुळे अनिल कपूर यांनी आपल्या नव्या चित्रपटाचे नाव “एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हेच दिले आहे. या चित्रपटात मुलगी सोनम कपूरही त्यांच्या सोबत झळकणार आहे.

या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अनिल कपूर, जूही चावला अन्‌ राजकुमार सोनमची हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सोनमच्या आयुष्यातील एक गूपित ज्याबद्दल ती वारंवार बोलते, हे नक्की काय असेल याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा ट्रेलर अनिल कपूर यांनी ट्‌विट करत प्रदर्शित केला. “इसे दिमाग से नही, दिल से देखो, क्‍योंकी दिल दा मामला है…’ असे अनिलने ट्‌विटमध्ये म्हटले आहे. चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपट 1 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्राची बहिण शैली चोप्रा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)