अनिल कपूर आणि राजकुमार यांचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल 

नवी दिल्ली: ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव  यांचा ‘फन्ने खान’  चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे संपूर्ण टीमने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. दरम्यान, अनिल कपूर आणि राजकुमार काही दिवसांपूर्वी मुंबईत रोडवर चित्रपटाला प्रमोट करताना दिसले होते. या दोघांनी मुंबईच्या रस्त्यावर तुफान डान्स केला. तेव्हाचा त्यांचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अनिल कपूरने ‘राम लखन’ चित्रपटातील सिग्नेचर स्टाइलने चित्रपट प्रमोट केला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय प्रथमच पॉप सिंगरच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलीला गायक बनविण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची कहाणी ‘फन्ने खान’ मध्ये पाहायला मिळणार आहे. तब्ब्ल १८ वर्षानंतर ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरने सोबत काम केले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)