#HBD : अभिनेता ‘अनिल कपूर’ यांचा आज वाढदिवस  

अनिल कपूरची लव्ह लाईफ फारच रंजक आहे. ते सुनीता यांना पाहूनच त्यांच्या प्रेमात पडले. सुनीता यांचा आवाज त्यांना फार आवडत असे. त्यांनी 1984 मध्ये सुनिता कपूर हिच्याशी विवाह केला. त्यांना तीन मुली असून यातील सोनम कपूर ही अभिनेत्री आहे.

मुबंई –  हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिध्द आणि दिग्गज अभिनेत्यांपैकी एक नाव  म्हणजे ‘अनिल कपूर’ होय. गेल्या चार दशकापासून ते आजही त्यांची क्रेझ सिनेमा रसिकामध्ये कायम आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम टिकून ठेवले आहे.

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. त्यांचे वडिल सुरेंद्र कुमार हे चित्रपट निर्माते होते. घरात पहिल्यापासूनच फिल्मी वातावरण असल्याने ते नेहमी आपल्या वडीलांसोबत शूटिंग पाहण्यास जात असत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनिल कपूर यांनी 1979 मध्ये प्रदर्शित ‘हमारे-तुम्हारे’ या चित्रपटाव्दारे आपल्या करियरची सुरूवात केली. त्यानंतर अनिल कपूर यांनी  मेरी जंग, कर्मा, मिस्टर इंडिया, तेजाब, राम लखन यासारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. साल 1987 मध्ये प्रदर्शित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट त्यांच्या करियरमधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. त्यानंतर 2001 मध्ये आलेल्या ‘नायक’ चित्रपटातील त्यांची मुख्यमंत्र्याची भूमिकाही प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख बनविलेल्या ‘स्लमडाॅग मिलेनियर’ मध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. माधूरी दिक्षित आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतच्या त्यांचा अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली.

अनिल कपूर यांना आतापर्यंत चारवेळा फिल्म फेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबरोबरच साल 2000 मध्ये पुकार या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या करियरमध्ये आतापर्यंत जवळजवळ 125 सिनेमांत काम केले आहे.

अनिल कपूर यांनी 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ आणि ‘दिल धडकने दो’ यासारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. चालू वर्षात देखील त्यांनी ‘रेस-3’ या चित्रपटात अभिनय केला आहे.

-स्वप्निल हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)