अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका.. 453 कोटी भरा, नाहीतर तुरुंगवास

एरिक्सन इंडिया कंपनीने अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनील अंबानी याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणी अनील अंबानी यांना दोषी ठरवले आहे. तसेच  रिलायन्स टेलिकॉमचे संचालक सतिश सेठ आणि रिलायन्स इन्फ्राटेलचे अध्यक्ष छाया विरानी यांनी ४ आठवड्यांमध्ये एरिक्सन इंडिया ४५३ कोटी रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे कि,”महिन्याभरात १ कोटी रुपयांचा दंड न भरल्यास एक महिन्यासाठी तुरुंगात जावे लागेल.”

सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तीन व्यक्तीस प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड देखील लागू केला आहे.जो एका महिन्याच्या आत जमा केला नाही, तर त्यासाठी एक महिन्याची तुरुंगात शिक्षा दिली जाईल. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एरिक्सन इंडिया कंपनीने आरोप केला होता,”जर रिलायन्स कंपनीकडे ५५० कोटी रुपये राफेल करारा दरम्यान गुंतवणुकीसाठी आहेत, तर एरिक्सन इंडिया कंपनीची थकित रक्कम देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे कसे नाहीत.” याबाबत याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश आर. एफ. नरिमन आणि विनित सरन यांच्या खंडपीठाने १३ फेब्रुवारीपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता.” मात्र या प्रकरणी आपली बाजू मांडत अनील अंबानी यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)