राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयाने नाराज काँग्रेस कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. पण राजीनाम्यावर अडून बसलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे काँग्रेस नेत्यांचे सारे प्रयत्न फेल जात असल्याचे दिसत आहे.

त्यातच आज सकाळच्या सुमारस एका काँग्रेस कार्यकर्त्यांने दिल्लीतील काँग्रेस कार्यालयसमोर झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने स्थानिक आणि पोलीसाच्या सतर्कतेमुळे त्याला रोखण्यात यश आले. संबंधित कार्यकर्त्यांला याविषयी विचारले असता त्याने सांगितले की, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अन्यथा मी फाशी घेईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here