अँगेला मर्केल : 2021 मध्ये घेणार राजकीय संन्यास 

बर्लिन – जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी 2021 मध्ये राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.
बर्लिनमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. जर्मनीत नुकत्याच झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये त्यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाची हार झाली आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे अँगेला यांनी म्हटले आहे.

डिसेंबरमध्ये त्यांच्या पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात नेतेपदासाठी दावा करणार नाही. तसेच चान्सलरपदाची सलग चौथी कारकिर्द संपल्यानंतर कुठलही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2000 साला पासून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे. अँगेला मर्केल यांचे जुने प्रतिस्पर्धी फेड्रीक मर्झ यांनी याआधीच त्यांची येत्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

जर्मनीमध्ये अलीकडच्या काळात अतिउजव्या पक्षांचे प्रस्थ वाढत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अँगेला मर्केल यांची चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली होती. मर्केल यांनी 2015 साली सीरियातल्या निर्वासितांसाठी देशाच्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचे बरेच पडसाद उमटले होते. संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा सत्कार केला असून, टाईम मासिकानेही ‘पर्सन ऑफ द ईअर’ने त्यांचा सन्मान केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)