#APP कॅनव्हा – एक परिपूर्ण डिझायनिंग अॅप

तुमच्या घरातल्या कोणत्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका बनवायचिये? गर्लफ्रेंड ला स्वतः बनवलेले ग्रीटिंग कार्ड द्यायचंय? किंवा सोशल-मेडियावर कुल पोस्ट टाकायच्या आहेत? या आणि अशा सर्व डिझायनिंग रिलेटेड प्रश्नांचं उत्तर आहे कॅनव्हा. गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी ‘फ्री’ उपलब्ध असलेल्या या अॅप्लिकेशनवर ६०००० हुन अधिक ‘टेम्पलेट’ डिझाइन्स आहेत. कॅनव्हा मध्ये २० हुन अधिक कॅटॅगिरीज दिल्या असून गरजेनुसार कॅटॅगिरी निवडू शकता. यामध्ये इंस्ट्राग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, फेसबुक कव्हर, युट्युब थम्बनेल इत्यादी सोशल नेटवर्कसाठी डिफॉल्ट आकारात डिझाइन्स बनवू शकता.
कॅनव्हा मधील कोणतेही डिझाईन टेम्पलेट निवडल्यानंतर त्यामधला फोटो बदलणे, टेक्स्ट बदलणे, रंगसंगती बदलणे असे एक-ना-अनेक पर्याय यामध्ये दिले गेले आहेत. जर तुम्हाला स्वतःची नवीन डिझाईन तयार करायची असेल तर तुम्ही ब्लॅंक टेम्प्लेट निवडून तुमच्या कलात्मकतेला वाव देऊ शकता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)