..आणि मोदींचा शायराना अंदाज फसला 

नवी दिल्ली – “शायद इसीलिए ग़ालिब ने कहा था कि ताउम्र ग़ालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और मैं आइना साफ़ करता रहा’, हा शेर वाचून दाखवत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी हा उर्दू शेर बोलून दाखवला. हा शेर गालिब यांचा असल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले. मात्र, मुळात हा शेर गालिब यांनी लिहिलेलाच नाही. त्यामुळे मोदींचा आजचा शायराना अंदाज चुकला अशी चर्चा ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर दिवस भर होती.

“गालिब’ यांच्या निधनाला 200 हून जास्त वर्ष होऊनदेखील आजही ते सर्वात जास्त प्रसिद्ध उर्दू कवी आहेत. गालिब यांची प्रसिद्धी इतकी आहे की, उर्दूमधील प्रत्येक शेर त्यांनीच लिहिला आहे असे समजून त्यांच्या नावे सांगितले जातात. जे शेर गालिब यांनी लिहिले नाहीत असे अनेक शेर त्यांच्या नावे ऐकवले जातात. पण ही चूक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले नाहीत. याआधी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार यांनीदेखील मार्च 2012 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना हाच शेर गालिब यांच्या नावे वाचून दाखवला होता. तसंच गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिग्दर्शक-निर्मात महेश भट्ट यांनी ट्विटरला हा शेर गालिब यांच्या नावे शेअर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)