अन्‌ कुणाल खेमूचा पाय घसरला

बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू हा शुटिंगदरम्यान जखमी झाला आहे. सोमवारी एका सिनदरम्यान पाय घसरुन त्याच्या गुडघ्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना कुणाल “अभय’ या वेब सिरीजची शुटिंग करत असताना घडली आहे.

“अभय’ या वेब सिरीजच्या शुटिंगदरम्यान एका पात्राच्या पाठीमागे धावण्याचा दृष्य शुट होत होता. याचवेळी कुणालचा पाय घसरला आणि त्याच्या खाद्यांला आणि गुडघ्याला दुखापत झाली. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार करत त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

या वेब सिरीजचे दिग्दर्शक केन घोष करत आहे. घोष म्हणाले की, कुणाल खूप वाईट पद्धतीने घसरुन पडला. ज्यामुळे तो लांबपर्यंत घसरत गेला. आम्ही शुटिंग तात्काळ थांबवत डॉक्‍टरांना बोलावले. त्याला खूप जास्त वेदना होत होत्या, असे त्यांनी सांगितले. शिवाय त्या दिवसाची शुटिंग पुर्णपणे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, “गोलमाल’ सिरिजमध्ये झळकणार अभिनेता कुणाल खेमू दिर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर झळकलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)