…अन् त्यानं रागाच्या भरात ईव्हीएमचं फोडलं

छपरा – 2019 मधील लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्यातील मतदानाला आज सकाळ पासून जोरदार सुरवात झाली आहे. तर काही ठिकाणी तणावाचे वातावरण दिसून येते आहे. सोनापूर विधानसभा मतदारसंघातील नायगा गोपालपूर येथे मतदान केंद्रा (क्रमांक १३१) वर मोठा गोंधळ उडाला आहे. या मतदान केंद्रावर रागाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार घडून आला आहे. ‘रंजीत पासवान’ असं या व्यक्तीच नाव आहे. ईव्हीएम मशीन फोडल्या प्रकरणी रंजीतला पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी चालू आहे. मात्र रंजीत पासवान यानं ईव्हीएम का? फोडलं हे अजून स्पष्ट झाले नाही.

https://twitter.com/ANI/status/1125262084655030272

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)