‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे

कल्याण – ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाइम शो न दिल्यामुळे मनसे पुन्हा एकदा कल्याण येथील मल्टिप्लेक्स चालकावर आक्रमक झाली आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट दिवाळी पाडव्याला रिलीज झाला. राज्यात या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकलेली दिसून आली. तसेच राज्यभरातून हा चित्रपट बघण्याऱ्यांची गर्दी दिसून आली.

दरम्यान, कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात. मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहात केवळ दुपारी तीन वाजता या सिनेमाचा शो आहे. या चित्रपटाचा दिवसभरात एकच शो होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर आमिर खान – अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचे दिवसातून आठ शो होतात. मराठी भाषेच्या सिनेमाला केवळ एकच शो दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटत प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हे डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)