…अन्‌ आयुक्‍त हर्डीकरांनी सांगितली “मन की बात’!

पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार ः मॉडर्न शैक्षणिक संकुलाकडून गौरव

निगडी – आयुक्त पदावर असताना अनेकवेळा अनावश्‍यक, अयोग्य अपेक्षा ठेवणाऱ्या माणसांना मी नाही म्हणतो. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे एक प्रकारची नकारात्मकता येऊ शकते. अनेकवेळा काही प्रलोभने देखील समोर येत असतात. मात्र अशा वेळी संताचे विचारच आपल्याला तारतात, अशी “मन की बात’ सांगत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी श्रोत्यांशी दिलखुमास संवाद साधला.

निमित्त होते. यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत आयुक्त हर्डीकर यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते हा समाजभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी देव महाराज, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह शरद इनामदार, संस्थेचे सचिव शामकांत देशमुख, मानसिंग साळुंखे, अमिता किराड, डॉ. प्रवीण चौधरी, राजीव कुटे, डॉ. अतुल फाटक आदी उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, लहानपण डोबिंवली येथे गेल्याने नागरिकरण कसे होऊ नये आणि विकास कसा व्हायला हवा याची जाणीव लवकर झाल्याची ते म्हणाले. सामाजिक संवेदनशिलता जपत काही बदल केल्यास नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. या विषयी बोलताना लहानपणीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराची एका महानगरात होणारी वाटचाल त्यांनी सांगितली. देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या या शहराचा नियोजनबद्ध विकास आयुक्त या नात्याने करणार असल्याचे ते म्हणाले.

हे सांगताना संत तुकाराम महाराजांच्या रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंर्तबाह्य जग आणि मन या अभंगाचा आशय सांगितला. अशावेळी सहृदयी नागरिकांची मदत चांगले काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी हवी आणि अशा सजग नागरिकामुळे शहराचा विकास होत राहील, असेही ते म्हणाले. संस्था उपकार्यवाह शरद इनामदार यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन प्रिती वाघोलीकर यांनी केले. सूत्रसंचालन अमोल नवलपुरे यांनी केले. तर आभार अतुल फाटक यांनी मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)