“स्टुडंट ऑफ द इयर 2′ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री अनन्या पांडेला अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर अनेकांनी अनेकांनी तिच्या शिक्षणावरुन तिची खिल्ली उडविली होती. या प्रकरणी अनन्याने आपल्या प्रवेशाबाबतचे काही फोटोदेखील शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. आता या वादात अर्जुन कपुरने उडी घेतली असुन त्याने अनन्याला एक मोलाचा सल्ला दिला आहे. अनन्याने तिच्या प्रमाणपत्रांच्या काही फाईल्स समोर ठेऊन याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
या पोस्टवर अर्जुन कपूरने कमेंट करत तिला मोलाचा सल्ला दिला आहे. लोक काय म्हणतात याचा कडे लक्ष देणे गरजेचे नाही. आपल्याला आणि आपल्या जवळच्यांना माहिती आपण काय करतो. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जे लोक तुझ्यावर टीका करतायेत त्यांना टीका करु दे. तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर आणि आपले काम करत राहा. दरम्यान स्टुडन्ट ऑफ द ईयर 2 नंतर आता अनन्या “पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.