आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा 50 कोटीचा टप्पा पार

ढेबेवाडी – आनंदराव चव्हाण पतसंस्थेने नवनवीन उपक्रम राबवत सहकार क्षेत्रात वेगळेच वलय निर्माण केले आहे. या संस्थेच्या प्रगतिचा सतत चढता क्रम राहिला असून संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात 50 कोटी ठेवींचा टप्पा ओलांडून सहकारात आपला दबदबा कायम ठेवला असल्याचे मत संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

मलकापूर, ता. कराड येथे आनंदराव चव्हाण पतसंस्था शाखेचा 17 वा वधार्पनदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, चेअरमन अभिजीत पाटील, व्हाईस चेअरमन आर. बी. पाटील, संचालक सदाशिव कदम, सुरेश मोहिते, बाळासाहेब पाटील, संजय साळुंखे, विद्याधर पाटील, अशोक चव्हाण, पांडुरंग पुजारी, शांताराम पाटील, प्रमोद मोरे तसेच शाखा सल्लागार, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजीत पाटील म्हणाले, संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदशनाखाली संस्थेने सहकार क्षेत्रातील नियम व अटींचे काटेकोरपणे पालन केले आहे. त्यामुळेच आज संस्थेचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. संस्थेने आरटीजीएस, एनईएफटी, मिनी एटीएम सेवा, चेक क्‍लिअरन्स, एसएमएस द्वारे माहिती तसेच सोने तारण, घर तारण, दिर्घ कर्ज शिवाय आकर्षक व्याज दराच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)