आनंदीबाई जोशींना ‘सरस्वती’ पुरस्कार देऊन चित्रपट महोत्सवाला सुरुवात

आनंदीबाई जोशी यांना आज सरस्वती फाळके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘सरस्वती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन विभागातर्फे (DMCS) घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी हा पुरस्कार देण्यात आला. यासाठी आनंदी गोपाळ चित्रपटाची ‘टीम’ उपस्थित होती. हा पुरस्कार आनंदी गोपाळ चित्रपटाच्या टीमने स्वीकारला. या व्यासपीठावर आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारणारी भाग्यश्री मिलिंद ही अभिनेत्री उपस्थित होती. तसेच गोपाळराव जोशी यांची भूमिका साकार करणारे ललित प्रभाकर, तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस हे देखील उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्राध्यापक समर नखाते यांनी ‘आनंदी गोपाळ’ प्रेक्षकांना एक विशिष्ट काळाचं दर्शन देण्यात यशस्वी झाला असल्याचे सांगितले. तसेच विक्रम गोखले यांनीही दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या कामाचं कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या महोत्सवाचे हे यंदाचे आठवे वर्ष आहे. आज आणि उद्या असा दोन दिवस हा महोत्सव सुरू असेल. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे. यासाठी देशभरातून अनेक लघुचित्रपटकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुणेकरांनीसुद्धा या महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)