श्रीलंकेच्या संसदेमध्ये अभूतपूर्व गोंधळ 

कोलंबो – श्रीलंकेतील संसदेमध्ये आज अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली आणि मिळेल त्या वस्तू फेकून मारल्या. यामुळे काही संसद सदस्य जखमी झाले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याविरोधातील अविश्‍वास ठराव संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर सिरीसेना यांच्या समर्थकांनी सभापती कारू जयसुर्या यांना घेराव घातला आणि फेरनिवडणूका घेण्याची मागणी केली. राजपक्षे यांनीही राजकीय संकट टाळण्यासाठी नव्याने निवडणूका घेण्याची मागणी केली. सभापती जयसुर्या यांनी ही मागणी मान्य केली.

मात्र पदावरून हटवण्यात आलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या “युनायटेड नॅशनल पार्टी’च्या सदस्यांनी फेरनिवडणूकीच्या मुद्दयावरून संसदेत मतदान करण्याची मागणी सुरू केल्यावर सदस्यांमध्ये संघर्ष सुरू झाला.
राजपक्षे यांनी “श्रीलंका फ्रीडम पार्टी’चे नेते पद सोडले आहे आणि त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर झाला असल्याने जयसुर्या यांनी राजपक्षे यांना संसद सदस्य या नात्याने संसदेत निवेदन करण्याची परवानगी दिली. मात्र त्याला विक्रमसिंघे यांच्या समर्थकांनी जोरदार हरकत घेतली.

संसदेतील कोंडी टाळण्यासाठी फेरनिवडणूका हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे राजपक्षे यांनी सांगितले. “युएनपी’चे नेते लक्ष्मण किरिएला यांनी संसदेमध्ये मतदान घेण्याची मागणी जयसुर्या यांच्याकडे केली. त्यावर जयसुर्या यांनी मतदानाची घोषणा करताच राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांना घेरले आणि दोन्ही बाजूंमध्ये प्रत्यक्ष हाणामारीला सुरुवात झाली.
या हाणामारीत सभापतींचा माईक तुटला, डस्टबीन, पेपरवेट फेकून मारले गेले. पुस्तकेही भिरकावली गेली.

कागदांचे तुकडे हवेत भिरकावले गेले आणि काही काळ एकच गोंधळ माजला. या झटापटीमध्ये एक खासदार जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. सभापतींनी सर्व पक्षनेत्यांची बैठक शुक्रवारी बोलावली आहे. संसदेचे कामकाज त्यानंतर सुरू होणे अपेक्षित आहे. सभापतींनी संसद परिसरातील तणाव पाहता सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)