…अन निर्मला सीतारामन यांनी घेतली शशी थरूर यांची भेट

तिरुअनंतपुरम – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये खडाजंगी आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. दररोज या ना त्या कारणामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर, मिळेल त्या शब्दांमध्ये टीका करत असल्याचे दिसत आहे. मात्र आज एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांची भेट घेतली.

झाले असे की, निर्मला सीतारामन या काही कारणामुळे आज तिरुअनंतपुरम मध्ये होत्या. आणि कालच तिरुअनंतपुरम येथील मंदिरामध्ये पूजेच्या वेळी तुला करत असताना शशी थरूर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी आज रुग्णालयात जाऊन शशी थरूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर शशी थरूर यांनी निर्मला सीतारामन यांच्या सोबतचा रुग्णालयातील फोटो आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर करत, भारतीय राजकारणात सभ्यता ही एक दुर्मिळ गुणधर्म असल्याचे लिहीत निर्मला सीतारामन यांनी ते सत्यात आणल्याने छान वाटले, असे म्हंटले आहे.

https://twitter.com/ShashiTharoor/status/1117992844172464130

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)