काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि खोतकर यांच्यात तासभर चर्चा ; निर्णय गुलदस्त्यात

औरंगाबाद: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी सेना-भाजप युती जाहीर करण्यात आली. मात्र युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत बंड सुरू होत असल्याचे चित्र आहे. जालन्यातून शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. आज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि खोतकर यांच्यात औरंगाबाद मध्ये भेट झाली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे.

जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे वैर सर्वश्रुत आहे. येत्या निवडणुकीत स्वबळाच्या नाऱ्यानंतर जालन्यात रावसाहेब दानवे यांना आस्मान दाखवू, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे. तरीही दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम आहेत.

-Ads-

युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असे म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. जालन्यात दानवे यांना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हीच संधी साधून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अर्जुन खोतकर यांना पक्षात घेऊन जालन्यातून उमेदवारी देणार असल्याचे म्हटले जात आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत, सुखदुःखात एकमेकांना मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या. मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. आनंदाची बातमी नसती तर आम्ही भेटलोच नसतो, असा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)