कर्मचारी भविष्य निधी, सामान्यतः पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) म्हणून ओळखला जातो, ही सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली निवृत्ती लाभ योजना आहे. या व्दारे कर्मचाऱ्याच्या एकूण पगारातील काही भाग दर महिन्याला एका वेगळ्या खात्यात जमा म्हणजेच ईपीएफ अकाउंटमध्ये जमा केला जातो. या पीएफची जमा रक्कम चेक करण्यासाठी सर्वात महत्वाचा नंबर तुमच्याकडे हवा तो म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नबंर. हा नंबर तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी संघटनेव्दारे दिला जातो. हा नंबर तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही काम करत असलेली जुनी कंपनी सोडून नवीन कंपनीत रूजू झालात तर तेव्हा हा नंबर शेअर करून तुमचा प्रॉव्हिडंट फंड तुमच्या जुन्या अकाउंटमध्ये जमा केला जाऊ शकतो.
सामन्यत: युनिव्हर्सल अकाउंट नबंर हा सॅलरी स्लीपवर लिहलेला असतो, पण काही परिस्थितीमध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर स्लीपवर उपलब्ध करून दिलेला नसतो. अशावेळी जर तुमच्याकडे सॅलरी स्लीप नसेल किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर माहित नसेल तर मग या सोप्या टिप्स वापरून तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळवा.
UAN अर्थात युनिव्हर्सल अकाउंट नंबर शोधण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता…
– सर्वात प्रथम ईपीएफओ (EPFO) मेंबर सर्विस (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in) पोर्टल वर जा. पोर्टलच्या उजव्या बाजूस खालील बाजूला Know Your UAN Status वर क्लिक करा.
– याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील- (अ)मेंबर आयडी (ब) आधार कार्ड (क)पॅन कार्ड. यापैकी एक पर्याय निवडा.
पत्यानंतर पेजवरील आवश्यक ती माहिती भरा. उदा- नाव, जन्मतारीख, रजिस्टर मोबाइल नंबर, रजिस्टर ईमेल आणि कॅप्चा.
– यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा.
– पुढील पेज वर असीशश या पर्यायसमोरील बॉक्सवर क्लिक करा.
– यानंतर ईपीएफओ कडून तुम्हाला मोबाईल वर एक एसएमएस प्राप्त होईल, त्यामध्ये ओटीपी नंबर येईल.
– ईपीएफओ पोर्टलवर प्राप्त झालेला ओटीपी टाका.
– यानंतर व्हॅलिडेट ओटीपी वर क्लिक करा आणि तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळवा.