इंडोनेशियाला भूकंपाचा तीव्र धक्का

लबुहा (इंडोनेशिया)- इंडोनेशियाच्या पूर्वभागातील मालुकू बेटाला काल संध्याकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या भूकंपामुळे त्सुनामी लाटांचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपची तीव्रता 7.3 इतकी होती. उत्तर मलुकू प्रांतातल्या तेर्नेटपासून 165 किलोमीटरवर हा भूकंप सर्वाधिक तीव्रतेने जाणवला.

भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे भयभीत झालेले नागरिक रस्त्यांवर पळत सुटले. त्यापैकी अनेकजण बरच कळ रस्त्यच्या कडेला थांबले, असे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले. लबुहा शहरामध्ये नागरिकांनी उंचावरच्या ठिकाणी जाण्यासाठी मोटरसायकलींचा वापर केला. भूकंपाच्या कालावधीमध्ये काहीवेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही. मात्र नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.

याच ठिकाणी गेल्या आठवड्यातही 6.9 क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. गेल्या वर्षी झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामींमुळे पालु आणि सुलावेसी बेटांवर 2,200 जणांचा मृत्यू झाला होता, तर किमान हजारजण बेपत्ता झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)