एक प्रयत्न “चिंतामुक्‍तीचा”

विनिता शाह

अलीकडील काळात मुलांना शाळेत जाण्यासाठी स्कूलबसशिवाय पर्याय राहिला नाही. सकाळी बसस्टॉपवर मुलांना आणणे आणि दुपारी मुलांना स्टॉपवरून ताब्यात घेणे ही आता बहुतांशी पालकांची नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, ज्यांचे आई-वडील नोकरदार असतील, त्यांना मुलगा वेळेवर घरी पोचला का नाही, याची काळजी किंवा चिंता असते; परंतु मायस्कूलबस ऍपने पालकांची ही चिंता दूर केली आहे. बसचा रिअल टाइम आणि लोकेशन सांगण्याचे काम हे ऍप करते.

पूजा खेमका आणि प्रिती अग्रवाल यांनी हे ऍप विकसित केले. केवळ पालकांनाच नाही तर शाळेला देखील अपडेट देण्याचे काम हे ऍप करते. या ऍपची कल्पना कशी सुचली याची कहाणी मोठी रंजक आहे. पूजा यांना आपल्या मुलास बसस्टॉपवर सोडणे आणि दुपारनंतर घरी आणणे ही तिच्या जीवनातील रोजचीच बाब ठरली होती. मात्र, एकदा दुपारी ती प्रिती नावाच्या मैत्रिणीसमवेत प्रदर्शन बघावयास गेली असता, वाहतूक कोंडीमुळे तिची बस चुकली.

कारण मुलाची बस येईपर्यंत तिला घरी पोचायचे होते; परंतु आता ते शक्‍य नव्हते. या विचाराने ती भयभीत झाली. काय करावे तिला सूचेना शाळेतूनही बस निघाली होती आणि बस चालकाचा फोन नंबरही नव्हता. यातूनच पूजा आणि प्रिती यांना मायस्कूलबस ऍपची कल्पना सुचली आणि त्यांनी प्रत्यक्षात साकारली. मायस्कूलबस ऍपमुळे पालकांची चिंता आता मिटली आहे. पूजाच नव्हे तर बहुतांश पालक आता मुलाची स्कूलबस ट्रॅक करू शकते आणि त्यानुसार नियोजन करू शकतात नियमित शाळा असो किंवा सहल असो, बस कोठे आहे, कोठे थांबली आहे, किती वाजेपर्यंत परत येईल, याबाबतचे अपडेटस्‌
मायस्कूलबस ऍप देते.

अहमदाबादमध्ये मायस्कूल बस ऍपला चांगला प्रतिसाद मिळाला. पालकांना सहजपणे वापरता येईल, अशी ऍपची त्यांनी रचना केली. मायस्कूलबस ऍपच्या माध्यमातून पालक, चालक आणि शाळा व्यवस्थापन यांना जोडण्यात आले. या ऍपची कार्यप्रणाली कशी चालते, याबाबतची माहिती प्रीतीने दिली. त्यानुसार, पाल्य ज्या स्कूलबस किंवा व्हॅनमधून शाळेत जाते त्या गाडीचे ऍलर्ट पालकाच्या मोबाइलवर पाठवले जातात.

चालकाला मार्ग लक्षात ठेवण्याची गरज नाही. ऍपवर विद्यार्थ्याच्या घराचा मार्ग दाखवला जातो. ऍपने दिलेल्या निर्देशानुसार बस चालवणे, एवढेच त्याच्या हाती काम असते. आपत्कालिन काळात मुलाला लवकर घ्यायचे असेल तर ऍपमधील दिशादर्शकच्या मदतीने बस गाठू शकतो आणि पाल्याला ताब्यात घेऊ शकतो. बसचे वेळोवेळी लोकेशन सांगण्याचे काम हे ऍप करते.

सुरुवातीला प्राथमिक चाचणीच्या पातळीवर ऍप सुरू करण्यात आले होते. आता मात्र ऍप अपग्रेड करण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. सध्या या ऍपचे दहा हजारांहून अधिक यूजर आहेत. त्यात 25 शाळा आणि 8 हजार पालकांचा समावेश आहे. सध्या हे ऍप अहमदाबाद येथे सक्रिय असून अन्य शहरात दिल्ली, मुंबई कोलकता येथे फ्रंचाईजी रुपाने कार्यान्वित करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)