“गली बॉय’मध्ये’ झळकणार अमृता सुभाष

“गली बॉय’ या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे. त्यात आता या चित्रपटात मराठी अभिनेत्री अमृता सुभाष याना पाहायला मिळणार आहे. अमृता सुभाष या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारणार आहे.

“गली बॉय’मध्ये झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट पाहायला मिळणार आहे. 26 वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाचा पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमृताने सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास खूप मजा आली, असे अमृताने पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करत आहे. या चित्रपटातील तिची बहुतेक दृश्‍य ही रणवीरसोबत चित्रीत करण्यात आली आहेत.

“गली ब्वॉय’चे बरचेस चित्रीकरण हे धारावीमध्ये करण्यात आले आहे. “गली बॉय’ हा चित्रपट येत्या “व्हॅलेंटाइन डे’ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)