आम्रपालीच्या संचालकांना न्यायालय अवमानाची नोटीस 

15 दिवस हॉटेलमध्येच रहावे लागणार 
नवी दिल्ली: आम्रपाली समूहाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकासह तिघा संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली आहे. न्यायालयाचे विविध आदेश न पाळण्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
न्या.यु.यु.ललित आणि न्या. डी.वाय चंद्रचूड यांनी आम्रपालीच्या अनिल कुमार शर्मा, शिव प्रिया आणि अजय कुमार यांना उद्या सकाळी नोएडाच्या “एसएचओ’समोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. आम्रपाली समूहाची कागदपत्रे ठेवली आहेत त्या ठिकाणी तसेच आम्रपालीच्या 46 उपकंपन्यांची कागदपत्रे असलेल्या 9 मालमत्तांना सील ठोकण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
अटक केलेल्या तिन्ही संचालकांना हॉटेल पार्क ऍसेन्टमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. त्यांचे मोबाईल फोनही काढून घेण्यात आले आहेत आणि या तिघांनाही पुढील 15 दिवस पोलिस कोठडीऐवजी याच हॉटेलमध्येच रहावे लागणार आहे.
आम्रपाली समूहाच्या ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिटिंग करण्याचे काम पुढील चार आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)