शिवसेनेला धक्का! अमोल कोल्हेंच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ? 

पुणे: छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे चर्चेत असलेले अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा उद्या पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे राज्याच्या घराघरात पोहचलेले अभिनेते आणि शिवसेना नेते अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती कळत आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा उद्या पक्षप्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

उद्या मुंबई मध्ये दोन माजी आमदारांसह अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित मुंबईत हा प्रवेश होणार आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्याकडे तगडा उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र , आता तो तगडा उमेदवार हे अमोल कोल्हे असल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे.

काही दिवसांआधी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमधील गोविंद बाग इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अभिनेते अमोल कोल्हे हेदेखील त्यांच्यासोबत होते.

आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल होणार असल्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का असल्याचं बोललं जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)