पानसरे हत्या प्रकरणी अमोल काळेला 22 पर्यंत पोलीस कोठडी 

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडातील संशयित अमोल काळे याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांकडून पुढील तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्ष व आरोपीच्या वकीलांकडून युक्‍तिवादानंतर अमोल काळेला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पुणे येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने, तर कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्ये प्रकरणी बेंगलोर एसआयटीने अमोल काळेला अटक केली होती.

या तपासावेळी काळेकडून पानसरे हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले. त्यामुळे कोल्हापूर एसआयटीने बुधवारी काळेचा बंगळूरू येथून पानसरे हत्येप्रकरणी ताबा घेतला. गुरुवारी सकाळी कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांनी त्याला सात वाजून 26 मिनिटांनी अटक केली. त्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) वैद्यकिय तपासणी त्याची करण्यात आली. याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे करीत आहे. त्यांनी सकाळी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात काळेला हजर केले. यावेळी विशेष सरकारी वकील ऍड. शिवाजी राणे यांनी पानसरे हत्या प्रकरणात अमोल काळेचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.

-Ads-

दरम्यान, पानसरे हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु आहे. कोल्हापूर व बंगळूरू एसआयटी आणि दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय असे तिघे संयुक्तिरित्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यामुळे तपासातील बाबी प्रसारमाध्यमांना सांगू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने तपासयंत्रणेला दिले आहेत. अमोल काळेबाबत काय तपास केला याचा अहवाल कोल्हापूर एसआयटी 22 नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे ऍड. राणे यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)