जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारतानं आणखी एक सुवर्णपदक खिशात घातलंय. आजच्या दिवसाची सुरूवात भारतासाठी सुवर्णमय झाली आहे.

काल आशियाई स्पर्धेत भारताचा बाॅक्सर विकास कृष्णन हा तंदुरस्त नसल्याने उपांत्यफेरीत खेळू शकला नाही, त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागल्याने भारतीय चाहते निराश झाले होते. मात्र आज ही निराशा भारतीय बाॅक्सर अमित पांघल याने दूर केली आहे.

आशियाई स्पर्धेच्या चौदाव्या दिवशी बाॅक्सिंगमध्ये अमित पांघलचा याने भारतासाठी 14 वे सुवर्णपदक पटकाविले आहे. अमित पांघल याने 49 किलो वजनी गटात अंतिम फेरीत उझबेगिस्तानच्या हसनबाॅय दुस्तमताॅवचा पराभव करून बाॅक्सिंगमधले पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)