मोदींपेक्षा अमिताभ यांना पंतप्रधान बनविले असते – प्रियांका गांधी-वढेरा 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून राजकीय प्रचाराचा पारा चांगलाच चढला आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी नेता नाहीतर अभिनेता आहेत. जगातील सर्वात मोठा अभिनेता पंतप्रधान बनले आहेत. यापेक्षा अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान बनविले असते तर चांगले झाले असते, अशी टीका त्यांनी केली आहे. मिर्झापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या कि, भाजपचे लक्ष केवळ सत्ता प्राप्त करणे आहे. मोदींनी मागील निवडणुकीत दिलेली आश्वासनांची पूर्ती केली नाही. काँग्रेस खोटे आश्वासने देत नाही तर शेतकरी, गरीब, युवकांसाठी काम करते, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मिर्झापूर येथे प्रचारसभेवेळी अजान सुरु झाल्याने प्रियंका गांधी-वढेरा यांनी आपले भाषण थांबविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)