प्रोफाईल वर लावला पाकिस्तानी पंतप्रधानांचा फोटो
मुंबई – अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकौंट हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका तुर्कीश हॅकर ग्रुपने त्यांचे हे अकाऊंट हॅक केले आणि त्यावर बच्चन यांच्या प्रोफाईल फोटोच्या जागी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटा लावला आहे. त्यांच्या व्यक्तीगत माहितीत लव्ह पाकिस्तान हा शब्दप्रयोगही हॅकर्सनी वापरला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर युनिट कडे तक्रार दाखल केली आहे.
सोमवारी रात्री 11 वाजून 40 मिनीटांनी त्यांचे हे अकाऊंट हॅक केले गेले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. त्यांचे हे अकाऊंट नंतर अर्ध्या तासांनी पुर्ववत करण्यात आले. त्या आधी बच्चन यांचे बॅंक अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे वृत्त पसरले होते पण त्याचा नंतर इन्कार करण्यात आला.