अमिताभ बच्चनने सुरू केली “केबीसी-11’ची तयारी

बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या रिअलिटी गेम शो “कौन बनेगा करोडपती’च्या पुढील सीजनच्या तयारीला सुरूवात केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या ब्लॉगवरून माहिती दिली आहे. अमिताभने लिहिले की, “केबीसी’ची तयारी सुरू करण्यात आली असून या शोच्या सिस्टम, नवीन इनपुट्‌स, रिहर्सल आणि सीजनची तैयारी सुरू केली आहे.

देशभरात गाजलेल्या या गेम शोचे अमिताभ बच्चन यांनी तब्बल 9 सीजनला होस्ट केले आहे. या गेम शोमध्ये त्यांनी स्वतःच्या आयुष्यावरही चर्चा केली होती. अमिताभने ब्लॉगवर पोस्टमध्ये नमूद केले की, आता 2019 वर्ष सुरू आहे आणि हा शो 2020मध्ये सुरू होईल. या 19 वर्षांमधील दोनच वर्षे अशी आहेत जी मी या शोमध्ये सहभागी होउ शकलो नाही. पण 17 वर्षे हा दिर्घ काळ आहे.

या शोच्या इंट्रोडक्‍शनच्या शूटिंगला प्रारंभ करण्यात आला आहे. आता या शोच्या 11व्या सीजनसोबत अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दर्शकांसमोर येणार आहेत. तसेच या शोमध्ये काय नवीन असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)